न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ३ ऑक्टोबर २०२५) :- चॅलेंजर पब्लिक स्कूलचा विद्यार्थी ईश्वर पाटील (इयत्ता २ री) याने जी.के. गुरुकुल येथे झालेल्या स्टेट लेव्हल विद्यान फेस्ट इंटरस्कूल स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. या यशामुळे शाळेचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल झाले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे संचालक संदीप काटे यांनी ईश्वरचे कौतुक केले. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांची प्रगती म्हणजेच शाळेची खरी ओळख आहे. ईश्वरचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.” तसेच शाळेच्या प्राचार्या सुविधा महाले यांनीही ईश्वरचे अभिनंदन करत त्याच्या सातत्य व परिश्रमाचे कौतुक केले.
ईश्वरच्या यशामध्ये त्याच्या शिक्षक रोहिणी वानखेडे व स्वप्नाली प्रतापवार यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असल्याचे शाळेतर्फे सांगण्यात आले. सततचे प्रोत्साहन आणि मेहनतीमुळेच ईश्वरला हे यश मिळाले आहे.
ईश्वर पाटीलच्या कामगिरीमुळे संपूर्ण शाळेत आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्याचे अभिनंदन केले जात आहे.












