- सांगवी वाहतूक शाखेकडून वाहतुकीत बदल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑक्टोबर २०२५) :- पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी (दि. ६) मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सांगवी वाहतूक शाखेकडून विशेष वाहतूक बदल लागू करण्यात आला आहे.
पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत खालील रस्त्यांवर वाहनबंदी राहील –
- बँक ऑफ महाराष्ट्र पिंपळे गुरव चौकातून तुळजाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना बंदी.
- पर्यायी मार्ग : बँक ऑफ महाराष्ट्र पिंपळे गुरव चौकातून उजवीकडे वळून काशी विश्वेश्वर चौकमार्गे इंद्रायणी चौक.
- सुट्टी चौकातून तुळजाभवानी मंदिर परिसराकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना बंदी.
- पर्यायी मार्ग : सुट्टी चौकातून सरळ तुळजाभवानी मंदिराच्या दिशेने ६० फुटी रस्त्यावरून जाऊन, रामकृष्ण मंगल कार्यालय पिंपळे गुरव चौकमार्गे पुढील प्रवास.
कोजागिरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत मंदिर परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांचा प्रवेश बंद असेल. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.













