- अशा घटनांमध्ये आयटी अभियंते सर्रास पडतात बळी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑक्टोबर २०२५) :- दोन वेगवेगळ्या घटनांमधील ऑनलाईन घोटाळ्यांमध्ये तब्बल ₹2,58,40,920 इतक्या रूपयांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी पोलिसात नोंदविल्या गेल्या आहेत.
दोन्ही प्रकरणांत गुन्हे ऑनलाइन प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम ग्रुपद्वारे घडल्याचे आढळले असून आरोपींनी गुंतवणूकदारांना मोठा ‘नफा’ दर्शवून पैसे काढण्यापूर्वीच अनेक रक्कमेच्या भरपाईची मागणी करुन फसवणूक केली.
पहिल्या प्रकरणात फिर्यादी (वय ५२) यांना Trustline Securities कर्मचाऱ्यांनी व्हॉट्सअॅपवर संपर्क करून “Trustline Strategy Circle” नावाच्या ग्रुपमध्ये समाविष्ट केले. स्टॉक-मार्केट मार्केटिंगचा भास दाखवून त्यांना अॅप डाउनलोड करून विविध बँक खाते नंबरांवर एकूण ₹48,36,126 गुंतवण्यास भाग पाडले. अॅपमध्ये गुंतवणुकीसह एकूण ₹76,36,780 इतका दाखवा नफा दिसून, पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता व्यवहार रोखले गेले आणि ग्रुपमधून रिमुव्ह केले. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून सध्या कोणालाही अटक झालेली नाही. पोलीस निरीक्षक अमोल नांदेकर (गुन्हे शाखा) तपास करीत आहेत.
दुसऱ्या तक्रारीत Telegram च्या “SC India stock circle” ग्रुपमधील अॅडमिन व काही व्हॉट्सअॅप अकाऊंटधारकांनी पीडितास बनावट इक्विटी अकाऊंट दाखवून गुंतवणूक करुन एकूण ₹2,10,04,794 इतक्या रक्कमेची फसवणुक केली, असे फिर्यादीने म्हटले आहे. या प्रकरणातही आरोपींनी सुरवातीला मोठा नफा ( ₹6,94,11,353) दाखवून नंतर ‘फीस’ व ‘टॅक्स’ भरल्याशिवाय पैशांची परतफेड न करण्याचे प्रकार केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी फिर्यादी पोनि रविकिरण नाळे यांनी तक्रार नोंदवली आहे.
ओळखीच्या अथवा अनोळखी ग्रुपमधील गुंतवणूक-लिंकवर थेट क्लिक करू नये, कोणतेही बँक व अकाऊंट तपशील शेअर करू नये आणि शंकास्पद व्यवहार आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.













