न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याच्या कामाला वेग आला असून, नव्याने निश्चित झालेल्या ३२ प्रभागांच्या सीमांनुसार मतदारांचे विभाजन सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभा मतदार यादी ही या नव्या महापालिका मतदार यादीचा आधार मानण्यात येत आहे.
या प्रक्रियेनुसार ६ नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी महापालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर नागरिकांना आपली नावे तपासता येतील तसेच हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली जाईल. अंतिम यादी २८ नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे.
महापालिकेच्या मागील निवडणुकांमध्ये मतदारसंख्येत गोंधळ, नावे गहाळ होणे अशा तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे यंदा संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने राबवली जात आहे.
सहा नोव्हेंबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ती महापालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, महापालिका…













