न्यूज पीसीएमसी नेटवर्क
कासारवाडी (दि. १७ ऑक्टोबर २०२५) :- कासारवाडी येथील ह क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी पार पडलेल्या जनसंवाद सभेनंतर काही तक्रारदारांनी अधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर गर्दी केली.
सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत सभा पार पडली होती. मात्र १२ वाजल्यानंतर आलेल्या नागरिकांना सभेत प्रवेश नाकारण्यात आला, यामुळे संतापलेले नागरिक केबिन बाहेर थांबले. वाढत्या गर्दीमुळे प्रशासनाने महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात केले.
दरम्यान, तक्रारदार व शिपायामध्ये हुज्जत झाल्याने अतिक्रमण अधिकारी बाहेर आले व गोंधळ वाढला. अखेरीस क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांनी नागरिकांना वैयक्तिक भेटीची परवानगी देत तक्रारींचे त्वरित निरसन करण्याचे आश्वासन दिले.
सभेला उपायुक्त निलेश भदाने, अभियंता सतीश वाघमारे, आरोग्य अधिकारी अंकुश झिटे, अतिक्रमण अभियंता संदीप हजारे, उपअभियंता सुनील दांगडे आदी अधिकारी उपस्थित होते.













