- पिंपरीच्या नगर भूमापन कार्यालयाचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरीतील नगर भूमापन कार्यालयाने जमीन मोजणी आणि फेरफार नोंदींसंबंधी नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा पंधरा दिवसांत केला जात असल्याचा दावा केला आहे. या कार्यालयात सातबारा उतारा, मिळकत पत्रिका, फेरफार नोंदणी उतारा, परिशिष्ट ‘अ’ आणि ‘ब’ प्रती, नमुना ९ आणि १२ नोटिशी, तसेच नगर भूमापन आलेख अशा सेवा संगणकीकृत पद्धतीने दिल्या जात आहेत.
दरमहा सुमारे ४७५ अर्ज दाखल होत असून, बहुतांश अर्ज मोजणी, फेरफार व नकलसंदर्भातील असतात. अर्जांपैकी दोन टक्के तक्रारी स्वरूपात येतात, ज्यांचा निपटारा पंधरा दिवसांच्या आत केला जातो. ऑनलाइन ‘ईपीआयसीस’ प्रणालीद्वारे फेरफारविषयक तक्रारी, नमुना १२ नोटीस, सुनावणी आणि अंतिम निर्णय एकाच माध्यमातून करण्यात येतो.
“नागरिकांच्या तक्रारींवर वेळेत आणि योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जातो,”
– अमित ननावरे, नगर भूमापन अधिकारी…












