- सरकारी कामात आणला अडथळा; सहाजण गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रावेत (दि. 13 नोव्हेंबर 2025) :- रावेत येथील जागेची सरकारी मोजणी सुरू असताना फिर्यादी व त्यांच्या मुलासह मोजणीसाठी उपस्थित कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी भोंडवे कुटुंबातील सदस्यांसह एकूण १३ ते १४ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
घटना 12 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1 वाजता घडली. फिर्यादी अशोक कोंडीबा म्हस्के (वय 61, रा, रावेत) हे अधिकाऱ्यांकडून त्यांच्या जमिनीची मोजणी करून घेत असताना आरोपी बेकायदेशीररित्या घटनास्थळी जमले. “ही जमीन आमची आहे, येथे मोजणी होऊ देणार नाही,” असा प्रतिबंध करत त्यांनी फिर्यादीला विरोध केला.
दरम्यान, आदित्य भोंडवे, आदर्श भोंडवे, प्रतिक भोंडवे आणि यश दत्तात्रय भोंडवे यांनी रविराज गायकवाड यांना हाताने मारहाण करत त्याचे गचके धरले. त्यानंतर आरोपी महिला हिने अक्षय म्हस्के यांच्यावर मागून हल्ला केला. पुढे राजेंद्र भोंडवे यांनी फिर्यादीवर धावून जाऊन मारहाण केली. नंतर १३ ते १४ जणांनी मिळून फिर्यादीवर हल्ला करत हात-पायाने मारहाण, कपडे फाडणे आणि शिवीगाळ करत जीव घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणीगुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सपोनि कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.












