न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने पिंपळे गुरव, नवी सांगवी तसेच जिल्हा रुग्णालयाच्या दोनशेहून अधिक सुकलेल्या झाडांना पाणी देऊन जीवदान देण्यात आले.
मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी यासाठी पुढाकार घेत पाण्याचा टॅकर उपलब्ध करून दिला. वृक्ष संवर्धनासाठी मागेल त्यांना मोफत टॅकर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, मुळशी विभाग प्रमुख मीनाताई करंजवणे, युवक अध्यक्ष आतिष गायकवाड, अक्षय जगदाळे, पंडित वनसकर, राहुल शेंडगे, आप्पाजी चव्हाण, अशोक जाधव, श्रीरंग शितोळे, प्रदीप गायकवाड, विनायक बिराजदार, सचिन सांगावे, नीलेश जगदाळे, विक्रम जगदाळे, बाळासाहेब शिंदे, सागर शेलार, सचिन नेमाडे आदी उपस्थित होते.














