न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- पिंपळे सौदागरमधील गणेश रेसिडेन्सीच्या क्लब हाऊसमध्ये शनिवारी (दि. १) रोजी पुणे सहकारी गृहनिर्माण महासंघाने आयोजित केलेल्या ‘सहकार दरबार’ मध्ये दहा सोसायट्यांना प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्यात आले.
वितरण प्रसंगी नगर भूमापन अधिकारी शिवाजीराव भोसले, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे वरिष्ठ संचालक सुभाष ढवळे, गृहनिर्माण महासंघाचे संचालक अनिल असगेकर आदी उपस्थित होते. ज्या गृहनिर्माण संस्थांनी प्रॉपर्टी कार्डसाठी कागदपत्रे सादर केली होती. त्यातील १० सोसायट्यांना प्रतिनिधिक स्वरूपात प्रॉपर्टी काडाचे वितरण करण्यात आले.
या वेळी शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते इलेक्ट्रिका होम्स, दी क्रेस्ट, साई श्री, गणेश रेसिडेन्सी आदी सोसायट्यांना मालमत्ता पत्रकांचे वितरण करण्यात आले. पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे वरिष्ठ असंचालक सुभाष ढवळे यांच्या हस्ते संस्थांच्या प्रतिनिधींना तुळशीचे रोपे भेट देण्यात आली. भोसले यांचा या वेळी ‘एक्सलन्स अॅवॉर्ड’ मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.














