न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर प्रतिनिधी :- पिपळे सौदागरमधील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल च्यावतीने महात्मा गांधी जयंती निमित्ताने शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने शाळेच्या आवारात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याद्वारे स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन अभियानातील विजेत्या वर्गांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आली.
यावेळी तात्या शिनगारे, सुनील गन्वंडे, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाबिश व सहशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला तात्या शिनगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिक्षकांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूवर आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्यावरील देशभक्तीपर गीत गायन केले. शिवांगी निस्ताने यांनी सूत्रसंचालन केले व रेणू राठी यांनी आभार मानले.