- समाजकारण, कार्यकर्त्यांशी नाळ आणि जनतेतील विश्वासामुळे तापकीरांचे नाव चर्चेत..
- पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २७ नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना प्रभाग २२ (काळेवाडी–विजयनगर) येथे राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षात या प्रभागात सर्वाधिक इच्छुक असल्याचे दिसते; मात्र यापैकी सोमनाथ तापकीर हे उमेदवारीसाठी सर्वात प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहेत.
तापकीर यांचे स्थानिक समाजातील काम, नागरिकांशी घनिष्ठ नाळ, तसेच पक्षातील निष्ठा यामुळे त्यांना मोठा पाठिंबा असल्याचे स्पष्ट होत आहे. खासकरून आमदार शंकर जगताप यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख असून पक्षात त्यांची कार्यशैली सकारात्मक मानली जाते.
कोरोनाकाळातील सेवा त्यांच्या ओळखीचे मोठे भांडार ठरले. औषध फवारणी, सॅनिटायझेशन, इंजेक्शन उपलब्धता, गरजूंना वैद्यकीय मदत, पूरग्रस्तांना सहाय्य, अन्नधान्य वितरण, आरोग्य व रक्तदान शिबिरे, स्वच्छता उपक्रम अशा विविध मार्गांनी त्यांनी लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला.
तापकीर यांच्या उपक्रमांमुळे महिला वर्ग विशेष समाधानी असल्याचे दिसते. नवरात्र उत्सव, दांडिया कार्यक्रम, महिला कलागुणांना वाव देणारी स्पर्धा आणि आकर्षक बक्षीस यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते. तरुण, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक वर्गातही त्यांच्या कामाविषयी समाधानाची भावना दिसून येते.
भाजपने रहाटणी–पिंपळे सौदागर मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर तापकीर यांनी ती प्रभावीपणे पार पाडली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत तापकीर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आणखी मजबूत झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
प्रभाग २२ मध्ये तापकीर यांच्या नेतृत्वाखाली भाजप पूर्ण पॅनेल विजयासाठी सज्ज होत असल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे.
















