न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- भोसरी एमआयडीसीत पथदिवे असूनही ब-याच भागात अंधाराचे सावट पसरल्याचे चित्र आहे. यातच भर म्हणून रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे आहे.
भोसरी येथील महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयापासून एमआयडीसीकडे जाताना एड्स रिसर्च संस्थेपर्यंतच्या मार्गातील पथदिवे बंद असल्याची तक्रार कामगारांनी केली आहे. रात्रपाळी संपवून घरी जाणाच्या कामगारांना याचा त्रास होत आहे अंधारामुळे अपघाताची शक्यता आहे.
पालिकेच्या विद्युत विभागाने या प्रश्नांकडे गांभिर्याने लक्ष देऊन पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी कामगारांनी केली आहे. रात्रपाळी संपवून घरी जाताना अंधारातच वाहन चालवावे लागते. खड़े समोर येईपर्यंत दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे पथदिव्यांचे काम तातडीने करावे, अशी मागणी भोसरीतील विनोद बिरादार यांनी केली आहे.











