न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- आकुर्डी येथील द्वारकामाई साई देवस्थान या मंदिराचा १९ वा वर्धापनदिन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. यानिमित्ताने धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री साईनाथ महाराजांना अभ्यंगस्नान, पंचामृत अभिषेक, होम – हवन, माध्यान्ह व धूपारती करण्यात आली.
आमदार गौतम चाबुकस्वार, नगरसेवक प्रमोद कुटे, ऊर्मिला काळभोर, संजय मरकड, सनी वाघचौरे, बंटी गुजर आदी यावेळी उपस्थित होते. ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आगामी काळात अद्ययावत ध्यान मंदिर व सभा मंडपाचे काम सुरू करण्यात येणार असून, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका वर्ग व लायब्ररी सुरू करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे नियोजन द्वारकामाई साईबाबा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष चेतन राऊत, सचिव संतोष पवार, कार्याध्यक्ष शिवदास सातपुते, खजिनदार सचिन शेखर तसेच तज्ज्ञ संचालक संजय शिंदे, सदाशिव कुंभार, जहांगीर पठाण यांनी केले.











