न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- आखिल भारतीय जैन कॉन्फ्ररन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष व भोसरी जैन श्रावक संघाचे माजी अध्यक्ष व उद्योजक राजेंद्र चोरडिया यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला.
राज्यात दुष्काळाचे सावट असताना वाढदिवसानिमित्त कोणताही डामडौल न करत, वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम रद्द करून, वाढदिवसाचा खर्च पांजरपोळ संस्थेला गुप्तदान स्वरूपात देण्याची भावना राष्ट्रीय युवाध्यक्ष सागर सांकला यांनी व्यक्त केली.
या भावनेचा आदर करीत वाढदिवसाचा खर्च पांजरपोळ संस्थेला देण्यामुळे समाजात नवीन पायंडा रचला गेला आहे. यावेळी जैन संघाचे अध्यक्ष सुभाष चुत्तर, डॉ. जवाहर भळगट, राजेंद्र बांठिया, विजय काका कर्णावट, डॉ. प्रदीप गांधी, संजय भंडारी, संजय बोरा, गिरीश मुथियान, सुभाष डुंगरवाल, उद्योजक योगेश चोरडिया आदींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छ्या दिल्या.
यात विशेषकरून भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, आमदार महेश लांडगे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष पारसजी मोदी यांनीही दूरध्वनीवरून चोरडिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.











