न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०२५) :- पिंपरी येथील न्यायालयाच्या आवारात बुधवारी सर्व वकिलांनी ‘राष्ट्रीय वकील दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा केला. देशाचे पहिले राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस ‘राष्ट्रीय वकील दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
यावेळी पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बारच्या महिला सचिव अॅड. रिना मगदूम, अॅड. गणेश राऊत, अॅड. दिपक गायकवाड, अॅड. दिपक साबळे, अॅड. अतुल कांबळे, अॅड. अजिंक्य भालके, अॅड. जान्हवी गाडे, अॅड. निलेश टिळेकर, अॅड. सोहेल शेख, अॅड. किरण सोनवणे आदी उपस्थित होते.
अॅड. गणेश राऊत यांनी वकिली व्यवसायाचे महत्त्व अधोरेखित केले. कायदा आणि न्यायव्यवस्था यामध्ये वकिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. वकिलांनी नैतिक मूल्यांचे पालन करून पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
अॅड. दिपक साबळे यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या कायदेशीर आणि राजकीय योगदानाचा गौरव केला. डॉ. राजेंद्र प्रसाद हे केवळ मोठे वकील नव्हते, तर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही मोलाची भूमिका बजावली. त्यांचा आदर्श घेऊन तरुण वकिलांनी समाज आणि राष्ट्राच्या उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन केले.
अॅड. दिपक गायकवाड यांनी उपस्थित मान्यवर आणि वकिलांचे आभार मानले. हा दिवस वकिलांच्या व्यावसायिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आणि प्रेरणा देणारा ठरला, अशी प्रतिक्रिया अनेक वकिलांनी व्यक्त केली.


















