न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- अल्ताफ याने पीडित मुलीचा मागील दोन वर्षांपूर्वी पाठलाग केल्याने त्यांच्या घरच्यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर दोन कुटुंबांनी हे प्रकरण आपसात मिटवले होते. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पीडित मुलगी भाजी आणण्यासाठी आकुर्डी मंडई येथे गेली. भाजी खरेदी करून ती परत घरी येत असताना अल्ताफ याने तिला अडवले. तिचा पाठलाग करून विनयभंग केला.
अल्ताफ याने मुलीचा हात पकडला, यामुळे मुलीने अल्ताफला लाथ मारली. यावरून अल्ताफ यानेही मुलीला मारहाण केली. ही घटना एकतर्फी प्रेम प्रकरणातून गुरुवारी (दि. ३० मे) रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास क्रांतीनगर, आकुर्डी येथे घडली.
याप्रकरणी १७ वर्षीय मुलीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अल्ताफ शेख (वय २५, रा. आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.











