न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जून २०१९) :- राठोड यांचे रहाटणी येथे चारभुजा मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास महेश हेडफोन खरेदी करण्यासाठी राठोड यांच्या दुकानात गेला. महेशने दुकानातून हेडफोन खरेदी केले आणि पैसे न देता निघून जात होता. त्यावेळी राठोड आणि महेश यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून महेश याने दुकानातील पितळ्याची धूपदाणी राठोड यांना फेकून मारली.
तसेच दुकानाच्या काउंटरवरील काचा फोडून नुकसान केले. राठोड यांना मारहाण करून जात असताना दुकानातील कामगारांनी महेशला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, महेशने दुकानातील कामगारांना देखील शिवीगाळ करत हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवार (दि. २) रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास रहाटणी येथील चारभुज मोबाईल शॉपी या दुकानात घडली.
दीपाराम नथाराम राठोड (वय ३४, रा. रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महेश सावंत (रा. थेरगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.











