- ‘सुधारित मेट्रो ‘डीपीआर’ प्रलंबित असल्याचे पुरवणी मागणी मधून वेधले राज्यशासनाचे लक्ष..
- पुरवणी मागण्यांमधून शहरासाठी प्रलंबित निधीचा मार्ग होणार मोकळा -आमदार शंकर जगताप..
- चापेकरवाडा पुनर्विकास प्रकल्पाला गती येणार- आमदार शंकर जगताप..
- जलनिस्सारण प्रकल्प, जकात अभय योजनेबाबत मांडल्या पुरवणी मागण्या..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि.१२ डिसेंबर २०२५) :- शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम आणि वेगवान व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहरांमध्ये मेट्रो सुविधा उपलब्ध झाली. सार्वजनिक वाहतुकीमध्ये वेगवान व्यवस्था उपलब्ध झाल्याने नागरिकांकडून विस्तारित मार्गांची मागणी वाढू लागली यामुळे निगडी ते चाकण हा महत्त्वाकांक्षी विस्तारित मार्ग मेट्रोसाठी प्रस्तावित केला गेला. मात्र सुधारित डीपीआर अद्यापही प्रलंबित आहे. तातडीने यासाठी मंजुरी घेतली जावी जेणेकरून पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान होईल अशी मागणी गुरुवारी आमदार शंकर जगताप यांनी पुरवणी मागण्यांच्या आधारे केली आहे.
आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक महत्त्वाच्या विषयांना पुरवणी मागण्यांच्या आधारे शासनासमोर मांडले आहेत. यामध्ये चाफेकर पुनर्विकास प्रकल्प, जलनिसारण प्रकल्प, जकात अभय योजना यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा देखील समावेश होता.
याबाबत आमदार शंकर जगताप म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचे नागरिकरण प्रचंड प्रमाणात वाढत आहे या भागातील आयटी सेक्टर, कारखानदारी,औद्योगिक आस्थापना लक्षात घेऊन या शहरांमधील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच माध्यमातून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आणि वेगवान असेल तर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल याचा अनुषंगाने नागरिकांच्या मागणीप्रमाणे मेट्रोचे अनेक नवीन मार्ग विस्तारित करण्यात येत आहे. पुणे ते शिवाजीनगर, शिवाजीनगर ते पिंपरी असा हा मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला . दुसऱ्या टप्प्यामध्ये पिंपरी ते निगडीचे विस्तारीकरण करण्यात आले. पिंपरी ते निगडी हे विस्तारीकरण साधारण साडेचार किलोमीटर इतके आहे. यासाठी 950 कोटी रुपयांचा खर्चाचा प्रस्ताव तयार होऊन कामाला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे. निगडी ते मुकाई चौक, मुकाई चौक ते वाकड आणि वाकड ते मानकर चौक, कोकणे चौक ते पिंपळे गुरव या मार्गे संत तुकाराम नगर ते चाकण आणि चाकण ते वाकड आणि वाकड ते निगडी असा हा चाळीस किलोमीटरचा मार्ग आहे. यासाठी 10 हजार 383 कोटीचा डीपीआर पिंपरी चिंचवड महापालिकेने केंद्र सरकारकडे प्रस्तावित केला आहे. या डीपीआरसाठी राज्य शासनाने मंजूरी दिल्यास पिंपरी चिंचवड शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला बळकटी मिळेल.
चापेकरवाडा पुनर्विकासासाठी 41 कोटींचा निधी द्या.
चिंचवड मतदार संघामध्ये चापेकर वाडा आहे. चापेकर बंधूंनी स्वातंत्र्य लढ्यात हिरीरीने सहभाग घेत आपल्या प्राण्यांचे अवती दिली एकाच घरातील तीन युवक देशाच्या स्वातंत्र्यसम्राट धारातीर्थी पडले. स्वातंत्र्याचा हाच आदर्श पुरस्कृत व्हावा, स्वातंत्र्याची महती वर्षानुवर्ष गायली जावी यासाठी या चापेकर वाड्याचे पुनरुज्जीवन आणि जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकाच कुटुंबातील तीन सख्खे भाऊ भारतीय स्वातंत्र्यसाठी फासावर लटकल्याची जगातील एकमेव घटना असलेले क्रांतीवीर चाफेकर बंधूचे चिंचवड येथील वाड्यात “क्रांतीतिर्थ स्मारक” क्रांतीवीर चाफेकर स्मारक समितीच्या वतीने उभारण्याचा निर्धार करण्यात येणे. क्रांतीतिर्थ स्मारकात ऐतिहासिक वास्तू, छायाचित्र आणि शस्त्रांचे संग्रहालय उभारण्यासाठी राज्य शासनाने विकास आराखडयाच्या अंमलबजावणीसाठी जुन, २०२३ मध्ये मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ४१ कोटींच्या निधीचा प्रस्ताव मंजुर करुनही अद्यापही निधी प्राप्त झालेला नाही. शासनाने चाफेकर वाडा तिर्थस्थळाच्या विकास आराखडयाची अंमलबजावणी करण्याकरिता क्रांतीतिर्थ स्मारकासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. 41 कोटींचा निधी तातडीने शासनाने सुपूर्त करावा अशी मागणी आमदार शंकर जगताप यांनी केली आहे.
अभय योजना तात्काळ मंजूर करा.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जकात बंद झाली आहे. मात्र जकात बंद झाल्यानंतरही कर न भरलेले 45 हजार 483 व्यापारी स्थानिक कर 2800 कोटी अधिक 6 हजार 557 रुपयांचा कर थकीत आहे. हा थकितकर वसूल करण्यासाठी व्याज व दंड शंभर टक्के माफ करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने अभय योजना लागू केली. या अभयो योजनेचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास महापालिकेला 2800 कोटी रुपयांचा निधी शहर विकास कामांसाठी उपलब्ध होणार आहे. अभय योजना तात्काळ मंजूर करून 2015 पासून प्रलंबित असलेला हा निर्णय तातडीने मंजूर व्हावा.
जलनिसारण प्रकल्प खर्चाला मंजूरी देण्याची मागणी.
जलनिसारण प्रकल्पाच्या कामासाठी प्रकल्प सादर करण्यात आलेला आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आलेला आहे. 44 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला निधी वितरित करण्याची मागणी देखील आमदार शंकर जगताप यांनी केली आहे.
पुरवणी मागण्यांच्या आधारे शहरातील प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पिंपरी चिंचवड शहराकडे खास लक्ष आहे . त्यामुळे या पुरवणी मागण्यांच्या आधारे प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास आहे . मुख्यत्वे निगडी ते चाकण हा महत्त्वाकांक्षी मेट्रोचा विस्तारीत मार्ग आगामी काळात प्राधान्याने पूर्ण करायचा आहे . त्या अनुषंगाने केंद्राकडे प्रलंबित असलेला डीपीआर राज्य शासनाने तातडीने मंजूर करून घ्यावा. जेणेकरून पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक अत्यंत सक्षम आणि वेगवान होईल अशी मागणी पुरवण्याच्या आधारे केलेली आहे.
शंकर जगताप
आमदार पिंपरी चिंचवड शहर.

















