न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- नृत्य दिग्दर्शक अमोल मोरे व कास्टिंग डायरेक्टर रौफ शेख यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या मिस्टर आणि मिस ग्लॅम फॅशन स्पर्धेत पुरुष गटात नासेर शेख मिस्टर तर प्रियांका जाधव मिस ठरली.
पाटलाचा वाडा मध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमास फॅशन आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते इम्रान अन्सारी, दिग्दर्शक सुनील वाईकर, संदीप बालवडकर, नितीन जाधव, मॉडेल व ऍक्टर डॉ. ऋतू साळवे, शिवाजी घोडे, ग्लॅम चे अध्यक्ष अमोल मोरे तर उपाध्यक्ष रौफ शेख आदी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय मॉडेल स्वाती जैन, अभिश्री राजपूत, अश्विन कोडगूले, मॉडेल स्नेहा भालेराव आणि हिना शर्मा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेत मिस्टर गटात प्रतीक गुज्जर दुसरा, मार्क लाला तिसरा तर मिस गटात करूणा साळवी दुसरी, संजना केंद्रे तिसरी अशी बक्षीस देण्यात आली. ग्लॅम फॅशन स्पर्धेत मिस्टर आणि मिस फोटोजेनिक फेस अथर्व मुळे , नम्रता संन्यासी तर मिस्टर आणि मिस महत्वाकांक्षी प्रथमेश गुंजाळ, श्रीजा तुपे हे मानकरी ठरले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता ग्लॅम टीम चे फॅशन स्टाइलिस्ट अदित्य दुडकेकर, विर राजहंस, डीझायनर डॉ. वेदिका कामत, रंगभूषाकार नाजीस शेख, दीपक गायकवाड, आसिफ शेख, कल्याणी शाह, ज्ञानेश्वरी शिंदे, श्वेता फुले, सूरज फावडे, ऋतिक बनकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता शुक्ला आणि अमोल मोरे यांनी तर भारती मोरे यांनी आभार मानले.