न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- गेल्या अनेक दिवसांपासून कासारवाडी येथे गणेश विसर्जन घाट उभारण्याकरिता नगरसेविका आशा शेंडगे यांचे शासन दरबारी प्रयत्न चालू होते. याकरिता शेंडगे यांच्या वतीने बजेटचे वर्गीकरण, भूमिपूजन, कामाचा वेळोवेळी पाठपुरावा, नियमित पाहणी आदी कामांचा पाठपुरावा चालू होता.
अखेरीस शेंडगे यांच्या प्रयत्नास यश मिळाले व महापालिकेने गणेश विसर्जन घाट निर्माण करण्याकरिता मंजुरी दिली. शेवटी सर्व कामांचे सोपस्कार पार पडून हा प्रकल्प उभा राहिला.
या घाटाचे ‘कै. महिपती सखाराम जवळकर गणपती विसर्जन घाट’ असे नामकरण करण्यात आले असून कासारवाडी परिसरातील भव्य-दिव्य अशा या प्रकल्पाचा नुकताच उद्घाटन समारंभ महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पार पडला व महापौरांच्याच हस्ते दीड दिवसीय गणेशाचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी महापौर राहुल जाधव, नगरसेविका आशा शेंडगे व प्रभागातील सर्व नागरिक उपस्थित होते.