न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बारामती प्रतिनिधी : दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या खुनाचा कट उघडकीस आला आहे. पोलीसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक देखील केली आहे. या घटनेमुळे पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे दौंड विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल कुल यांच्या खुनाचा कट उघडकीस आला आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक देखील केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
आमदार राहुल कुल यांच्या खुनाचा कट रचण्यात आला असल्याची माहीती पोलीसांना खबर्यांमार्फत मिळाली होती. त्याचा तपास केल्यानंतर खुनाचा हा कट उघडकीस आला. अवजड वहानाच्या धडकेने आमदार कुल यांच्या गाडीला अपघात करण्याचा कींवा विहिरीच्या ब्लास्टींगसाठी वापरण्यात येणार्या स्फोटकांनी गाडी उडविण्याचा हा कट होता.
खुनाच्या कटाचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, प्रशासन स्वच्छ करण्याच्या मोहीमेमुळे हितसंबंध दुखवलेल्या समाजकंटाकाचा यामागे हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.