- प्रभाग क्रमांक २७ रहाटणीमध्ये प्रचाराला नागरिकांकडून वाढता प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
गणेश नखाते यांच्यासोबत सुमन गणेश नखाते यांची प्रचारामध्ये आघाडी.. (दि. २४) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ रहाटणी येथे प्रचाराची चांगलीच धामधूम सुरू झाली असून, सर्वच इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. मात्र, या गदारोळात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे गणेश शिवराम नखाते. त्यांच्या प्रचाराला सध्या विशेष वेग मिळताना दिसत असून, त्यांच्या सौभाग्यवती सुमन गणेश नखाते या देखील खांद्याला खांदा लावून प्रचारात सक्रिय झाल्या आहेत.
पूर्ण नखाते परिवार प्रचारात सहभागी असला तरी, प्रचाराची मुख्य धुरा सध्या सुमन गणेश नखाते यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. घराघरांत जाऊन संपर्क, महिलांशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करत त्यांनी प्रचारात वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महिलावर्गाचा वाढता प्रतिसाद आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळताना दिसत आहे.
गणेश नखाते हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असून, जनतेच्या प्रश्नांसाठी तत्काळ धावून येणारा कार्यकर्ता अशी त्यांची प्रभागात ओळख आहे. स्व. लक्ष्मण जगताप राजकारणात असतानापासून गणेश नखाते हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. सध्या ते आमदार शंकर जगताप यांचेही विश्वासू व जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात.
समाजाप्रती असलेली आस्था, नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची धडपड आणि पक्षनिष्ठा लक्षात घेता, या निवडणुकीत पक्ष आपल्याला नक्कीच संधी देईल, असा विश्वास गणेश नखाते यांनी व्यक्त केला आहे. सौभाग्यवतींची साथ आणि प्रभागातील मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता, नखाते दाम्पत्याचा प्रचार दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असून, त्यांच्या विजयाबाबत समर्थकांमध्ये ठाम विश्वास निर्माण झाला आहे.












