न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी प्रतिनिधी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रेरणेने नगरसेवक राजेंद्र किसनराव लांडगे यांच्यावतीने प्रभाग परिसर व कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
महात्मा गांधीनी जगाला स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचे नागरिकांना महत्व पटवून देण्याचे आवाहन केले होते. यावेळी महात्मा गांधीप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी याकरिता या स्वच्छ्ता अभियानाचे आयोजन करण्यात आले असे नगरसेवक राजेंद्र लांडगे म्हणाले.
यावेळी प्रभागातील नागरिक, सर्व सफाई कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला.