न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड :- महात्मा गांधीच्या जयंतीनिमित्त उपमहापौर सचिन चिंचवडे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग तसेच ब क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार दिनांक २. ऑक्टो. रोजी सायली कॉम्प्लेक्स ते वाल्हेकर वाडी चौक येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी ब प्रभाग अध्यक्षा व स्थायी समिती सदस्या करुणा चिंचवडे, ब प्रभाग स्वीकृत सदस्य बीभीषण चौधरी, भाजप पदाधिकारी हेमंत ननावरे, सविता पंडित आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.