- समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे सादर..
- नागरिकांच्या पाठिंब्यावर व्यक्त केला विजयाचा विश्वास..
संतोष जराड :- प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र. २६ मधून स्नेहा रणजित कलाटे यांना भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज समर्थकांच्या उपस्थितीत निवडणूक विभागाकडे सादर केला. त्यांच्या प्रचाराला सुरुवातीपासूनच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पक्षाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत, “हा लढा जनतेसाठी आणि विकासासाठी” असल्याचे सांगितले.
ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी असल्याचे कलाटे म्हणाल्या. मोठ्या संख्येने नागरिक, महिला व तरुण प्रचारात सहभागी होत असल्याचे दिसून येत असून, “नागरिकांच्या आशीर्वाद आणि पाठिंब्यावर ही निवडणूक जिंकू,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपच्या प्रगतीशील विचारधारेतून विकास, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या मूल्यांना प्राधान्य दिल्यामुळेच पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवत मला अधिकृत उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी म्हणजे केवळ निवडणूक नसून जनतेच्या विश्वासावर आधारित सेवाभावी प्रवास आहे. महिलांचे सक्षमीकरण, तरुणांसाठी संधी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने उपाय या मुद्यांवर प्रचारात त्यांचा भर राहणार आहे, असे स्नेहा कलाटे यांनी ‘न्यूज पीसीएमसी’शी प्रतिक्रिया देताना सांगितले.












