- प्रचारादरम्यान काळेवाडी गावठाणात भाजपचे उमेदवार विनोद नढे यांचे भव्यदिव्य स्वागत..
संतोष जराड :- प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ३१ डिसेंबर २०२५) :- प्रभाग क्र. २२ चे अधिकृत उमेदवार विनोद नढे यांच्या प्रचारयात्रेला काळेवाडी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काळेवाडी गावठाण येथे ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने भव्यदिव्य स्वागत करून त्यांना जाहीर पाठिंबा दिला. २५ फुटी पुष्पहार, फटाके आणि घोषणाबाजीच्या गजरात नढे यांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले.
प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरी सोयी आणि स्थानिक समस्या यांची सखोल जाण असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याचा निर्धार नढे यांनी व्यक्त केला. नागरिकांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि तातडीने उपाययोजना करणे हीच आपली कार्यपद्धती असल्याचे त्यांनी सांगितले.
नढे यांनी शिवकृपा कॉलनी, गुरुकृपा कॉलनी, चतु:शृंगी कॉलनी, श्रद्धा कॉलनी परिसरात नागरिकांशी संवाद साधत प्रचार केला. महिलांचा, ज्येष्ठांचा आणि तरुणांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
काळेवाडी गावठाणातील ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराने नढे यांना जाहीर पाठिंबा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रस्ते, पाणी, स्वच्छता, उद्याने आणि नागरी सुविधा यांसह प्रभागाच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.












