- नववर्षाच्या अनोख्या शुभेच्छांसह विकासाच्या ‘रोडमॅप’ला तरूणाईची पसंती…संतोष जराड :- प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. 31 डिसेंबर 2025) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२, काळेवाडी (क) गटात भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विनोद जयवंत नढे आणि हर्षद नढे यांचा झंझावती प्रचार वेग घेत आहे. प्रभागातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत विकासकामांची माहिती देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
बुधवारी (दि. 31) रोजी प्रचाराची सुरुवात ‘काळेवाडीची ग्रामदेवी’ शितळामाता देवीचे दर्शन घेऊन करण्यात आली. त्यानंतर भाजपाच्या चारही उमेदवारांनी एकत्रितपणे ज्योतिबानगर परिसरातील आझाद कॉलनी क्रमांक 1, 2 आणि 3 येथे भेट देत मतदारांशी संवाद साधला. या ठिकाणी प्रचारपत्रक वाटप, नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत गाठीभेटी घेतल्या गेल्या. वृद्ध, महिला आणि तरुण मतदारांनी यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विकासकामांना गती, मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते आणि पाणीपुरवठा या मुद्द्यांवर कार्य करण्याचा निश्चय या प्रसंगी विनोद नढे यांनी व्यक्त केला. याचबरोबर लोकनेते, आमदार स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या शक्तीस्थळाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण नागरिकांना देण्यात आले. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
आगामी काही दिवसांत प्रचार अधिक आक्रमक करण्याची आणि प्रभागातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याची तयारी कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. त्यामुळे प्रभाग २२ मधील निवडणूक लढतीला आता अधिक रंग चढताना दिसत आहे.












