- प्रभाग क्रमांक २२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जोशपूर्ण प्रचार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ४ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ (विजयनगर–काळेवाडी–आदर्शनगर) येथे शनिवारी (दि. ३) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार उत्साहात पार पडला. सकाळपासूनच परिसरात कार्यकर्त्यांची लगबग, ताशांचा गजर, घोषणांनी दुमदुमलेले रस्ते आणि उमेदवारांच्या समर्थनार्थ निघालेल्या प्रचार रॅलींमुळे निवडणुकीची चुरस अधिक वाढलेली दिसली.
या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मोनीकाताई नवनाथ नढे यांच्यासह मच्छिंद्र तापकीर मैदानात असून, ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हावर बटण दाबून त्यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
मोरया कॉलनी, गणेश कॉलनी, जोगेश्वरी हॉस्पिटल परिसर, विजयनगर आदी भागांत काढण्यात आलेल्या पदयात्रांना स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत विकासकामांबाबत मोनिकाताई नढे या आपली भूमिका मांडताना म्हणाल्या, “प्रभाग २२ च्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, जबाबदार आणि जनतेला न्याय देणारे प्रशासन उभे करणे हा आमचा निर्धार आहे. नागरिकांचा विश्वास हीच आमची ताकद आहे. ‘घड्याळ’ चिन्हावर मतदान करून आम्हाला संधी द्या. तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करू.”












