- प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपच्या पॅनेलला मतदारांचा ‘दमदार’ पाठिंबा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ४ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर काळेवाडीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार दिवसेंदिवस जोर पकडताना दिसत आहे.
‘क’ गटातील भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद जयवंत नढे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे अ) पाडळे निता विलास, ब) काळे कोमल सचिन, ड) हर्षद सुरेश नढे हे निवडणुकीस सामोरे जात असून त्यांचे विकासाभिमुख विचार आणि नियोजन यामुळे प्रभाग क्रमांक २२ (काळेवाडी–विजयनगर–आदर्शनगर–पवनानगर–ज्योतीबानगर–नढेनगर–कोकणेनगर) चा परिसर आणि मतदार पूर्णपणे भाजपमय झाले असून भाजपच्या कार्याबाबत प्रभागात सकारात्मक लाट निर्माण झाली आहे. प्रभागासाठी सातत्यपूर्ण विकास, सुव्यवस्थित पायाभूत सुविधा आणि पारदर्शक कामकाज यांची हमी दिल्याने मतदारांचा विश्वास अधिक दृढ होताना दिसत आहे.
दरम्यान शनिवारी पार पडलेल्या प्रचार फेरीत पंचनाथ कॉलनी, १ व २३, शिवरत्न कॉलनी तसेच सहकार कॉलनी १,२,३ या भागांत घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून उमेदवारांचे स्वागत केले, तर तरुणांनी घोषणांच्या गजरात जोशपूर्ण उपस्थिती दर्शवली. नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, सार्वजनिक सोयी, क्रीडांगणे आणि आरोग्य सुविधा यांसारख्या मुद्द्यांवर सूचना दिल्या. त्या सूचनांची नोंद घेऊन त्वरीत नियोजन करण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात आले. यावेळी विनोद नढे यांना विशेष प्रतिसाद मिळाला. प्रभागातील अनेक विकासकामांत त्यांचा सहभाग असल्याने मतदारांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला.
“काळेवाडीतील तमाम मायबाप जनता हीच माझी खरी ताकद आणि प्रेरणा आहे. तुमच्या विश्वासामुळेच विकासाची गती कायम ठेवता आली. पुढील काळात अजून मोठी, लोकाभिमुख कामे करण्याचा आमचा निर्धार आहे. “कमळ चिन्ह” म्हणजे स्थैर्य आणि विकास याचे प्रतीक. येत्या १५ तारखेला ‘कमळ’ चिन्हावर बटण दाबून भाजपचे चारही उमेदवार विजयी करा”.
– विनोद जयवंत नढे, भाजपा अधिकृत उमेदवार – प्रभाग क्रमांक २२…












