न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ४ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर रहाटणी प्रभाग क्रमांक २७ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला वेग आला आहे. प्रभागातील विविध सोसायट्यांमध्ये भेटीगाठी, पदयात्रा आणि संवाद यात्रांमुळे प्रचाराची रंगत वाढली आहे. भाजपच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई विनोद तापकीर यांना परिसरातील सोसायट्यांतून वाढता पाठिंबा मिळत असून महिला, वरिष्ठ नागरिक आणि तरुण वर्गाचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे.
भाजपचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत नखाते यांच्यासह तापकीर यांच्या प्रचार मोहिमेत कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. विकासकामांचा आढावा, प्रभागातील प्रलंबित प्रश्न आणि येणाऱ्या काळातील नियोजन याबाबत मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला जात आहे. पक्षाचे संघटन मजबूत आणि विकासाचा स्पष्ट रोडमॅप असल्यामुळे नागरिकांचा विश्वास भाजपा उमेदवारांकडे झुकताना दिसत आहे. आगामी काळात मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सोयींना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
अर्चनाताई तापकीर म्हणाल्या, “रहाटणीतील नागरिकांनी दाखवलेला विश्वास आमच्यासाठी मोठी ताकद आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास, सुरक्षित वातावरण आणि उत्तम सुविधा देण्यासाठी आम्ही पूर्णत्वाने काम करू. तुमचा पाठिंबा आमच्यासाठी प्रेरणा आहे. येत्या १५ तारखेला मतदानाच्या दिवशी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करून आम्हाला साथ द्या, विकासाची गती अधिक वेगवान करू.”












