न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवार दिनांक २. ऑक्टो. रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पदयात्रा व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आमदार व भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक विलास मडिगेरी, शितल शिंदे, कैलास बारणे, स्वी. सदस्य बाबू नायर, विनोद तापकीर, अमित गोरखे, नगरसेविका सिमा सावळे, अनुराधा गोरखे, करुणा चिंचवडे, शर्मिला बाबर, शैला मोळक, उमा खापरे आदी नगरसेवक, पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
यावेळी ‘महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रा’ व ‘स्वच्छता अभियान’ या उपक्रमाची पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातून सुरुवात झाली. थिसेनकृप कंपनी परिसर, गोकुळ हॉटेल परिसर, भटनागर, पिंपरी भाजी मंडई व साई चौक परिसर व शेवटी डिलक्स चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
तसेच पिंपरी – चिंचवड शहरातील प्रभाग क्रं. ११ अजेंठानगरमध्ये स्वच्छता संदेश व प्रभात फेरी च्या माध्यमातून परिसर स्वच्छ करण्यात आला. यात सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आघाडीवर होते. शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, सदाशिव खाडे, मडिगेरी, शितल शिंदे, भीमा बोबडे, अश्विनी बोबडे, सीमा सावळे आदींनी आपआपल्या परीने या मोहिमेत सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ केला.
शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी नागरिकांना यावेळी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. केंद्र व राज्य सरकारने स्वच्छतेबाबत सुरु केलेल्या मोहिमेत नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. पक्षनेते एकनाथ पवार यांनी शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला असल्याने शहरातील नागरिकांनी स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहिले पाहिजे, जेणेकरून आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत असे मत व्यक्त केले.