न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जून २०१९) :- पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांच्या रोजाची आज बुधवारी (दि. ५) रोजी सांगता झाली. सकाळी दहाच्या सुमारास हजारो बांधवांचे सामूहिक नमाज पठण शहरातील ईदगाह मैदानावर करण्यात आले.
रमजान ईदनिमित्त शहरातील विविध मशिदींमध्ये आकर्षक सजावट करून रोषणाई करण्यात आली होती. नमाजपठण झाल्यानंतर एकमेंकाची गळाभेट घेत ‘ईद मुबारक’ म्हणत मुस्लिम बांधवानी एकमेकांनी शुभेच्छा दिल्या.
तसेच नेहरुनगर येथील मस्जिदमध्येही नमाज पठण झाले. त्यानंतर एकमेकांची गळाभेट घेत ‘ईद मुबारक’ म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लिम धर्मियांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत होता.













