न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जून २०१९) :- चिखली येथे पहाटे अडीचच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे प्लास्टीकच्या गोदामाला भीषण आग लागली. यात १७ दुकाने जळून खाक झाली आहेत. खासगी टँकर आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, ज्या ठिकाणी आग लागली त्यापासून काही मीटर अंतरावर मशीद होती आणि शेजारच्या खोल्यांमध्ये १०० नागरीक राहात होते. आगीची घटना घडल्यानंतर त्यांना अगोदर रूमच्या बाहेर काढण्यात आले. त्यामुळे जीवितहानी झाली नाही.
यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, अग्निशामक अधिकारी नामदेव शिंगाडे, अशोक कानडे, ऋषिकांत चिपाडेसह ४० कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग आटोक्यात आणली.













