- “निवडून येऊन घरी बसणारी नव्हे तर, प्रत्यक्ष काम करणारीच नगरसेविका हवी..”
- मतदानाआधीच भाजपच्या अनिताताई संदीप काटेंना मतदारांचा सकारात्मक कौल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ०८ जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २८ रहाटणी–पिंपळे सौदागर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे. या प्रभागातून भाजपच्या अधिकृत उमेदवार अनिताताई संदीप काटे या सक्रियपणे प्रचारात उतरल्या असून त्यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
अनिताताई काटे यांनी प्रचारादरम्यान भाजपचे सहउमेदवार शत्रुघ्न काटे, कुंदाताई भिसे आणि संदेश काटे यांच्यासह सोसायटी परिसरात भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, महिला सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी आणि मुलांसाठी उद्याने यासारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
दरम्यान “काम करणारी, संवाद साधणारी आणि कायम लोकांमध्ये असणारी महिला प्रतिनिधी हवी आहे,” अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत असून त्या अपेक्षेला अनिताताई काटे समर्थपणे उत्तर देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपची विकासाभिमुख धोरणे, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास हा त्यांचा स्पष्ट अजेंडा आहे.
प्रचारादरम्यान महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि सोसायटी प्रतिनिधींकडून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. विशेषतः महिलांमध्ये अनिताताई काटे यांच्या नेतृत्वाबाबत विश्वासाची भावना अधिक दृढ होत आहे. “निवडून येऊन घरी बसणारी नव्हे तर प्रत्यक्ष काम करणारी नगरसेविका निवडायची आहे,” अशी ठाम भावना मतदारांमध्ये दिसून येत असून त्याचा लाभ भाजपला होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.












