- अनिताताई कैलास थोपटे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. ०८ जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २७ रहाटणी–तापकीरनगर–श्रीनगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार जोमात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार अनिताताई कैलास थोपटे यांनी बुधवारी पक्षाच्या सहउमेदवार अश्विनीताई चंद्रकांत तापकीर यांच्यासह शिवराजनगर व तापकीरनगर परिसरातील विविध सोसायटींमध्ये भेटी देत प्रचार केला.
या प्रचारादरम्यान नागरिक, सोसायटी पदाधिकारी व कुटुंबीयांशी थेट संवाद साधण्यात आला. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक सोयीसुविधांबाबत नागरिकांनी आपली मते मांडली. अनिताताई थोपटे यांचे पती कैलास थोपटे यांच्या नगरसेवक पदाच्या काळात प्रभागात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती देत पुढील काळातील विकासाचा आराखडा नागरिकांसमोर मांडला.
माजी नगरसेवक कैलास थोपटे यांच्या पत्नी म्हणूनच नव्हे, तर स्वतःच्या कार्यपद्धतीमुळे अनिताताई थोपटे यांचा प्रभागात मोठा जनसंपर्क असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या अनुभवावर आणि कामाच्या पाठीमागे उभ्या असलेल्या भूमिकेवर नागरिकांनी विश्वास व्यक्त केला.
येत्या १५ जानेवारी रोजी घड्याळ या चिन्हाला मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन प्रचारादरम्यान करण्यात आले.












