- मग वाचा आर्थिक फसवणूकीची नवी ट्रिक…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि.२४ फेब्रुवारी २०२६):- निगडी पोलीस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजता फिर्यादी बजाज ऑटो आकुर्डी येथील कार्यालयात असताना आरोपी विकास कुमार (पूर्ण पत्ता अज्ञात) याने MNGL गॅस बिल थकले असल्याचे सांगून ‘Bill Update APK’ फाइल पाठवली.
ती डाउनलोड केल्यानंतर फिर्यादीच्या बँक खात्याची गोपनीय माहिती हॅक करून एकूण १,१५,२३५ रुपये विविध खात्यांमध्ये वळवण्यात आले.
संबंधित बँक व्यवहारांचा तपास सुरू असून सायबर पथकाची मदत घेण्यात येत आहे. २३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल झाला असून वपोनि बनसोडे पुढील तपास करत आहेत. आरोपी अटक नाही.











