- त्यांच्या हाकेला साद देत काळेवाडीत दोन हजार महिलांची वज्रमूठ..
- महिला सक्षमीकरणातून दिला विकासाच्या संकल्पाचा नारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी–नढेनगर–कोकणेनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद जयवंत नढे यांच्यासह उमेदवार हर्षद नढे, कोमलताई सचिन काळे आणि नीता पाडळे यांच्या प्रचारात महिला शक्ती मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली आहे.
भाजपाचे उमेदवार विनोद नढे यांच्या पत्नी सौ. प्रियंकाताई विनोद नढे यांनी महिलांना संघटित करत प्रचारात पुढाकार घेतला. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत सुमारे दोन हजार महिलांनी भाजपाला जाहीर पाठिंबा दिला. या वेळी महिलांसाठी आयोजित मेळाव्यात उत्साहाचे वातावरण होते.
या प्रसंगी आमदार शंकरभाऊ जगताप यांनी महिलांना मार्गदर्शन केले. काळेवाडी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल ७०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच लवकरच “लखपती दिदी योजना” सर्व महिला बचत गटांसाठी सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि सामाजिक विकासाच्या मुद्द्यांवर भाजप कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी कमळाला मतदान करून भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.












