- शनिवार-रविवारमुळे कागदपत्रांच्या जमवाजमवीत खर्ची होणार वेळ..
- महापालिका प्रशासनाकडून मुदतवाढीची अपेक्षा…
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख दि. २ मार्च २०२६ जाहीर करण्यात आली आहे. मात्र २८ फेब्रुवारी (शनिवार) व त्यानंतर रविवार सुट्टी असल्यामुळे इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी मिळणार आहे.
कमी कालावधीमुळे अनेक इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू असून काही जणांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करणे कठीण जात असल्याचे सांगितले जात आहे. समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळावी आणि पात्र उमेदवारांना अर्जासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तात्काळ दखल घेऊन अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेला मुदतवाढ द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील तसेच मान्यवर व्यक्तींना अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे गोळा करताना अडचणी येत आहे. प्रशासनाने स्वीकृत नगरसेवक पदाच्या अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ द्यावी.
– सचिन काळभोर, शहर भाजपा कार्यकर्ते…











