- जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर – कोमलताई सचिन काळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १२ जानेवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी–नढेनगर–कोकणेनगर येथे भाजपाच्या अधिकृत उमेदवार कोमलताई सचिन काळे यांनी प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधला. “स्वतःच्या फायद्यासाठी नव्हे तर समाजाच्या विकासासाठी राजकारणात आले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे उमेदवार विनोद जयवंत नढे, हर्षद नढे आणि नीता पाडळे उपस्थित होते.
महिला, विद्यार्थी, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण व स्वच्छतेच्या प्रश्नांवर ठोस काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
भाजप सरकारच्या विकासात्मक धोरणांमुळे शहराचा वेगाने विकास होत असून, त्याचा लाभ प्रभागातील प्रत्येक घटकाला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी दिला.
आगामी महापालिका निवडणुकीत कमळाला मतदान करून भाजपाला विजयी करा आणि विकासाला चालना द्या, असे आवाहन कोमलताई काळे यांनी मतदारांना केले.












