न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड कर सल्लागार संघटनेचे ज्येष्ठ कार्यकारिणी सदस्य मुकेश हिवाळे यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी अल्पशा आजाराने मंगळवार (दि. ४ जून) रोजी चिंचवड येथे दु:खद निधन झाले.
ते पिंपरी चिंचवड कर सल्लागार असोसिएशनचे गेली २० वर्षे सभासद, तसेच १० वर्षापासून कार्यकारिणी सदस्य होते. त्यांना दुर्धर आजाराने गेली दीड वर्ष त्रास होत होता. पिंपरी चिंचवड शहरातील नामावंत कर सल्लागार बी. के. हिवाळे यांचे ते ज्येष्ठ सुपूत्र होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, वडील असा परिवार आहे.















