न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून २०१९) :- राज्यात घेण्यात आलेल्या एमएचटी- सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत पिंपळे गुरव येथील काटे पुरम परिसरात राहणारी संस्कृती चुडे हिने एमएससीईटीमध्ये पुणे विभागातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.
तिला सीईटीमध्ये ९९.९६ टक्के गुण मिळाले. राज्य सीईटीमध्ये एकूण ३६ जिल्ह्यांतील १२६० परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. संस्कृती मॉडर्न कॉलेजची विद्यार्थिनी आहे. अभ्यासाबाबत बोलताना संस्कृती म्हणाली, एचएससी बोर्डाच्या धर्तीवर अभ्यास करत होते. मेडिकलला जायचे असल्याने जास्त अभ्यास केला. पुण्यात पहिली येईन, असे वाटले नव्हते.
पण, बोर्डाच्या दृष्टीकोनांतून अभ्यास केला होता. या तिच्या यशामध्ये आई, वडिल यांचा मोठा हिस्सा आहे. आई प्राथमिक शिक्षिका आहेत. तर, वडील इंदिरा महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.











