- महिंद्रा कंपनीजवळील घटनेत बस जळून खाक…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ फेब्रुवारी २०२६) :- चाकण एमआयडीसी परिसरातील निघोजे येथील महिंद्रा कंपनीजवळ निगडीवरून महाळुंगेकडे जाणाऱ्या पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बसने अचानक पेट घेतल्याची माहिती मिळत आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून काही वेळातच आगीने भीषण स्वरूप धारण केले. आगीमुळे बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. बसमधील प्रवासी व चालक यांनी वेळेत बाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, बसला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक बिघाडाचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.











