न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०१९) :- पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाड़ी (टीडीएफ) व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ आयोजित यंदाचा ‘जिल्हास्तरीय स्व. मा. आमदार शिवाजीराव पाटील गुणवंत शिक्षक पुरस्कार २०१९’ चिंचवड येथील शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विदयालयाचे शिक्षक दत्तात्रय भालेराव यांना जाहीर झाला आहे.
आपले शैक्षणिक, सामाजिक कार्य, अनुभव पाहता, आपली ”स्व. मा. आमदार शिवाजीराव पाटील गुणवंत शिक्षक पुरस्कार २०१९” साठी निवड झाली आहे, असे भालेराव यांना दिलेल्या पत्रात आयोजकांच्या वतीने म्हटले आहे.
या कार्यक्रमाचे रविवार (दि. ९) रोजी मंचर येथील मल्हार मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी १०.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे. सुधीर तांबे (आमदार, नाशिक विभाग) यांच्या हस्ते व कानडे सर (अध्यक्ष महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन) यांच्या अध्यक्षतेखाली भालेराव सर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


















