न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०१९) :- बारावीचा निकाल लागल्यापासून दहावीच्या निकालाची प्रतिक्षा सुरू झाली होती. निकाल आज लागणार उद्या येणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली. सोशल मीडियावर तारखा पडू लागल्यामुळे अनेकजण बुचकाळ्यात पडले होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०१९ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षा निकाल आज ८ जूनला दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर पाहता येईल. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वस्वाक्षांकित प्रतीसह सोमवारपासून (दि. १०) जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. छायाप्रतीसाठी सोमवारपासून २९ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे.
बोर्डाच्या अधिकृत www.mahresult.nic.in, www.sscresult.mkclo.rg, www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. विद्यार्थ्यानी MHSSC स्पेस सीट नंबर टाकून त्यानंतर ५७७६६ या क्रमांकावर एसएमएस केल्यास त्यांना दहावीचा निकाल कळू शकेल, असे विभागीय मंडळाच्या विभागीय सचिवांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.


















