न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने यांच्या चिखली येथील संपर्क कार्यालयाची आज शुक्रवार (दि. ७ जून) रोजी अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे.
दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हत्यारासह टोळक्याकडून हा हल्ला झाल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येत आहे. कार्यालयातील महिलेलाही अज्ञाताकडून मारहाण करण्यात आली आहे.
ही घटना लुटीच्या उद्देशाने की राजकीय घटनेने प्रेरित होऊन केली, याचा चिखली पोलीस तपास करीत आहेत.


















