न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०१९) :- चिंचवडगावातील वाल्हेकरवाडी येथील रेणुका तुलसी सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने उभारण्यात आलेल्या ३० किलोवॅटच्या सोलर विद्युत संचाचे उद्घाटन पर्यावरण दिनाच्या निमित्त करण्यात आले.
या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महापालिकेचे पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, उपशहर अभियंता मकरंद निकम, महावितरण चिंचवड उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इसीए संघटनेचे विकास पाटील, सोसायटीतील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या सोलर प्रकल्पाला एकूण १६ लक्ष रुपये खर्च आला असून, ४ लाख ८ हजार रुपये सबसिडी म्हणून परत मिळणार आहे. यामुळे सुमारे ३५ टन कोळसा जाळल्यावर जितके प्रदूषण होते, तेवढ्याच प्रमाणात होणारे प्रदूषण वाचणार आहे. तसेच पर्यावरणाचे संवर्धन होणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पामुळे सोसायटीकडून दरवर्षी भरले जाणारे ६ लाख रुपये वीजबिल वाचणार आहे.

















