न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०१९) :- मोरवाडी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे नवनियुक्त न्यायाधीश डी. आर. पठाण आणि न्यायाधीश आर. आर. काळे यांचा शुक्रवारी (दि. ७) पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला.
मोरवाडी न्यायालयातील वकीलांच्या कक्षात हा कार्यक्रम झाला. असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुनील कडूसकर यांच्या हस्ते न्यायाधीशांचा सन्मान करण्यात आला. न्यायाधीश पठाण व काळे तसेच असोसिएशनचे अॅड. कडूसकर यांनी मनोगत व्यक्त केले. असोसिएशनचे उपाध्यक्ष योगेश थंबा (कव्हेकर), सचिव गोरख कुंभार, सहसचिव अंकुश गोयल, खजिनदार संतोष मोरे, सदस्य रामचंद्र बोराटे, केशव घोगरे आणि सदस्य वकील उपस्थित होते.

















