न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०१९) :- रांजणगावस्थित झेड. एफ. स्टेयरिंग इंडिया प्रा. ली. कंपनीतील कामगारानी कंपनीच्या कामगारविरोधी व अन्यायकारक धोरणांच्या निषेधार्थ चक्रीय उपोषणा सुरु केले आहे.
या उपोषणास कामगार नेते इरफानभाई सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार (दि. ८) रोजी महाराष्ट्र मजदूर संघटनेने जाहिर पाठींबा दिला आहे. यावेळी संघटनेचे संघटक चंद्रप्रकाश वीर, प्रशांत करनजुले, पोपट गायकवाड़, सतीश लंके, नितिन मीसाळ, गणेश शिंदे, दिनेश आरने व एनकाई व्हील इंडिया लिमिटेड मधील महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सर्व सभासद, कामगार उपस्थित होते.
कामगारांनी कंपनीच्या आवारात ‘इरफानभाई जिंदाबाद, कामगार एकजूटीचा विजय असो’! अशा घोषणा देवून कंपनी परिसर दणाणून सोडला होता.
कंपनीच्या प्रशासनाने तात्काळ कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा कामगार एकजुटीच्या माध्यमातून प्रशासनास मागण्या मान्य करावयास लावू. – इरफान सय्यद (कामगार नेते)











