न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०१९) :- काळेवाडीतील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित, श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालयाच्या शाळेचा इयत्ता १० वीचा निकाल ९२.८५ टक्के लागला आहे.
यावेळी इंगळे निखिल मारुती हा दहावीच्या परीक्षेत ९२.६० टक्के घेऊन शाळेत पहिला आला आहे. तर, लोंढे ऋतुजा श्रीमंत ९१.८० टक्के घेऊन दुसरी तर, शिंदे सोहम बबन ८७.६० टक्के मिळवून तिसरा आला आहे. तसेच मराठी माध्यमातून सौदागर सलोनी युसूफ ८७.४० टक्के गुण मिळवीत शाळेतून प्रथम तर, स्वामी महेश मलयया ८३.६० टक्के गुण मिळवीत दुसरा तर भोसले रूपाली दत्तात्रय ही ७८.८० टक्के गुण मिळवीत तिसरी आली आहे.
यावेळी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष मच्छिंद्रशेठ तापकीर (मा विरोधी पक्षनेते पिं. चिं. मनपा), सचिव पै. सागर तापकीर, सौ. अनिताताई तापकीर (मा. नगरसेविका पिं. चिं. मनपा) व सर्व संचालक मंडळाच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले आहे.











