न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जून २०१९) :- इंदोरी परिसरातील पिंजणमळा येथे शुक्रवार (दि. ७) रोजी रात्री वादळी पाऊस पडला. अमराईच्या कुंपणाजवळील आंबे वेचण्यासाठी पिंकी केदारी व तिची दोन भावंडे इंदोरी येथील पिंजण मळा येथे गेले होते. तेथील संरक्षण तारेमध्ये विजेचा प्रवाह होता. याची पुसटशी कल्पनाही पिंकीला नव्हती.
विजेचा तीव्र धक्का बसून तिचा जागीच मृत्यू झाला. पिंकी बापू केदारी (वय ११ रा.इंदोरी, ठाकरवस्ती) असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. शनिवारी (दि. ८) सकाळी ९ च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पिंकी केदारी ही इंदोरी येथील जिल्हा परिषद् प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत होती. ती हुशार व गुणी मुलगी होती. आंबे संरक्षित करण्याच्या उद्देशाने सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे एका बलिकेचा बळी गेला आहे.
सविस्तर चौकशी करून या प्रकरणातील दोषी व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. – साधना पाटील (सहाय्यक पोलीस निरीक्षक, तळेगाव एमआयडीसी)














